नशिराबाद येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला काही आमिष दाखवत फूस लावून अपहरण केल्याची घटना उघळकीस आली.
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद शहरातील साती बाजार परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहात असलेल्या १७ वषीय अल्पवयीन मुलीला ती घरात एकटी असताना शुक्रवारी २० ऑक्टोबर रोजी दुपार च्या सुमारास गावातील अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून अपहरण केले.
कुटुंबातील सदस्य घरी आलेवर मुलगी घरात दिसली नाही म्हणून तिच्या वडीलांसह नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती दिसून न आल्याने अखेर २१ ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी अडीच वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.