कृषी सहाय्यक अधिकारी पंधरा हजाराची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात
मंडे टू मंडे न्युज वृत्तसंकलन।
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पावर ट्रेलर मशीनवर मिळणारी सबसिडी अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात दीड हजाराची लाच घेणाऱ्या कृषी सहाय्यक अधिकाऱ्याला एसीबी पथकाने रंगेहात पकडल्याने कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने त्यांच्या आईच्या नावे महाराष्ट्र कृषी विभागाची राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत शेती कामासाठी लागणारे बीसीएस पावर ट्रिलर मशीन घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. पाचोरा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडून सदरचा अर्ज मंजूर झाला होता. मशीन खरेदी केली असता या योजने अंतर्गत मिळणारी ८५ हजार रुपयांची सबसिडी अर्जदाराच्या खात्यात जमा करण्याच्या मोबदल्यात पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक ललितकुमार विठ्ठल देवरे ,वय-३२,रा. आनंद नगर, प्रतिभा फ्लोअर मिल जवळ, पाचोरा,याने दीड हजार रुपयाची मागणी केली होती.
तक्रार यांनी या बाबत जळगाव येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिल्याने त्यांच्या तक्रारी नुसार गुरुवारी २४ मार्च रोजी पथकाने सापळा रचून दीड हजार रुपयाची लाचेची रक्कम स्विकारतांना अधिकाऱ्याला रंगेहात पकडले.सदरच्या कारवाईत पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे,पो.हे.र्को.रविंद्र घुगे पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ. शैला धनगर,पो.ना.जनार्धन चौधरी, पी.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.मनोज जोशी, पो.कॉ.प्रविण पाटील,पो.कॉ.ईश्वर धनगर पो.कॉ.प्रदिप पोळ पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.महेश सोमवंशी, हे सहभागी होते.