महिलेच्या घरात रोकडसह सोन्याचे दागिन्याची जबरी चोरी : आरोपीना अटक !
जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जुन्या भांडणाच्या कारणावरून शहरातील रचना कॉलनीतील महिलेच्या घरात जबरी चोरी १ लाख रूपयांची रोकड आणि सोन्याची मंगलपोतसह सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना एमआयडीसी ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
याबाबत असे की, आशाबाई गोपाल चौधरी (वय-४२) रा. रचना कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ मार्च रोजी पाहटे ३ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनील रसाळ राठोड, संजय रसाळ राठोड रा. कासमवाडी, विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा आणि रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर यांनी महिलेच्या घरात घुसून मारहाण केली व घरातील सामानांची तोडफोड केली.
तसेच महिलेच्या घरात ठेवलेले १ लाख रूपयांची रोकड आणि सोन्याची मंगलपोतसह सोन्याचे दागिने असा एकुण २ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सुनील राठोड, संजय राठोड दोन्ही रा. कासमवाडी, विशाल पदमसिंग परदेशी रा. कुसुंबा, रुपेश संजय सपकाळे रा. कांचन नगर, गणेश भास्कर सोनार, अविनाश रामेश्वर राठोड, रा.रेणुका नगर मेहरूण जळगाव आणि ललीत उमाकांत पाटील रा. इश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यता आला होता. दोन्ही संशयितांना मंगळवारी २९ मार्च रोजी न्यायमूर्ती शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.