जळगाव जिल्ह्यातील ” या ” १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ शिक्षकांची नाव १ सप्टेंबर रोजी निवड समितीने जाहीर केले असून ‘आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी २६ प्रस्ताव आले होते दरम्यान निवड समितीने १५ शिक्षकांची नावं जाहीर केली.दरम्यान, यावर्षी १५ पुरस्कारामध्ये ७ महिला शिक्षकांचा समावेश आहे. यंदा शिक्षक दिनी ४५ शिक्षकांना पुरस्कार वितरण शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जळगाव येथील महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दिली.
प्रत्येक तालुक्यातून एका शिक्षकाची निवड…
जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी यंदा २६ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. याची छाननी करून नंतर निवड समितीने संबंधीतांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यानंतर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एक अशा १५ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांची नावे..
१) भडगांव यशवन्त नगर -श्रीमती मनिषा गोकुळ अहिरराव
२) भुसावळ ( मांडवा दिगर) रविंद्र माणिक पढार
३) बोदवड (मनूर बु) – श्रीमती मनिषा नारायण कचोरे
४) चाळीसगांव (शिवापूर) -उत्तम धर्मा चव्हाण
६) धरणगांव (मुसळी)- संजय पोपट गायकवाड
५) चोपडा( नागलवाडी)-विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील
७)एरंडोल (छंदांबर्डी) -लक्ष्मण वामन कोळी
८) जळगांव(कानळदा)- श्रीमती ललिता नितीन पाटील
९)जामनेर,(पाहूर कसबे) -श्रीमती किर्ती बाबुराव घोंगडे
१०)मुक्ताईनगर (पिंप्रीनांदू )– विजय वसंत चौधरी
११)पाचोरा (राजुरी )– श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत
१२)पारोळा ( मोंढाळे) -छाया प्रभाकर भामरे
१३) रावेर (खिरोदा)- रामराव ज्ञानोबा मुरकुटे
१४) यावल(साकळी )-समाधान प्रभाकर कोळी
१५) अमळनेर (शिरूर)– दर्शना चौधरी
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा