भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर १४ मार्च पासून प्रशासक राज,तर २१ मार्च पासून जिल्हा परिषदेवर प्रशासक

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांतील सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा कालावधी या महिन्यात पूर्ण होत असून जळगाव जिल्ह्यातील पंचायत समित्यांची मुदत १३ मार्चला पूर्ण होत आहे. यामुळे १४ मार्चपासून १५ पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्तीचे आदेश काढले आहे.

गटविकास अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहतील. तर जिल्हा परिषदेची पदाधिकाऱ्यांची मुदत २० मार्चला पूर्ण होत आहे. त्यावर २१ मार्चपासून प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया सूत्रे हाती घेतील. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट संपली असली तरी रुग्ण काही प्रमाणात आढळत आहेत. यामुळे या निवडणुका वेळेत होणार की लांबणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. राज्य शासनाने नुकतीच पालिका वॉर्डांची हद्दवाढ केली होती. त्यात पालिकांची वॉर्डसंख्या वाढली. त्या धर्तीवर ग्रामीण भागातही मतदारसंख्या वाढल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती गट, गणांची फेररचना करावी, हद्दवाढ करावी अशी मागणी झाली होती.

सप्टेंबरनंतरच निवडणूक
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषदेची निवडणूक सहा महिन्यासाठी पुढे ढकलली जाणार आहे. असे असले तरी प्रत्यक्षात १० गट वाढणार आहे. मात्र आरक्षणाबाबत सर्वच गटांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून, नवीन इच्छुकांमध्येदेखील निवडणूक लढवायची की नाही याबाबत मोठा संभ्रम आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!