जळगाव जिल्हा परिषदेवर उद्या पासून प्रशासक राज
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्हा परिषदेचा पंचवार्षिक कालावधी २० मार्च रोजी संपुष्टात येत असून २१ मार्च पासून प्रशासकीय राजवट सुरू होत आहे. प्रशासकीय राजवट सुरू होत असल्याने शासकीय वाहने असलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, विविध विषय समित्यांचे सभापती याना आपल्या जवळील शासकीय वाहने २० मार्च रोज रविवार पूर्वी शासकीय कार्यालयात जमा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले असून आता या पुढील कार्यकाळ प्रशासकाचा राहील.
जळगाव जिल्हा परिषदेतील विद्यमान अध्यक्ष,सर्व विषय सभापती सर्व जी.प.सदस्यांचा सन २०१७ ते २०२२ चा पंचवार्षिक कालावधी २० मार्च रोजी संपत आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यसरकारने अध्यादेश काढून त्याला राज्यपालांनी सहमती देऊन स्वाक्षरी सुद्दा दिल्याने जिल्हा परिषद,पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.