भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्र

आजही राज्यात मेघगर्जनेसह  अवकाळी पाऊस, गारपिटीचा इशारा

जळगाव,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भ मराठवा़ड्यासह इतरही काही जिल्ह्यांमध्ये सोमवारी पावसाने हजेरी लावली. तर, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट झाली आहे. यासोबतच जळगाव आणि मनमाडमध्येही काही ठिकाणी गारपीट झाली आहे. यानंतर आता आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सोमवारी झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, आजही यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यात आजही काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी संध्याकाळी रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा परिसरात जोरदार पाऊस २० मिनीटे सुसाट वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसामुळे वीज तारा तुटल्या, वीजपुरवठा खंडित झाला, तसेच सावदा परिसरतही जोरदार पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या जोरदार पावसाने तारांबळ उडाली.


सोमवारी जळगावमधील अमळनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. अमळनेर तालुक्यात सडावण ,दहीवद, नगाव, गळखांब, पातोंदा, सावखेडा या गावांमध्ये मुसळधार पावसासह गारपीट झाली. विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाने रात्रीच्या सुमारास जळगाव जिल्ह्यात हजेरी लावली. यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तसंच अंमळनेर तालुक्यात अनेक गावांमध्ये गारपीट झाली.

अचानकच्या आलेल्या अवकाळी पाऊस तसंच गारपिटीमुळे काढणीला आलेल्या गव्हासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पारोळा तालुक्यात भिलाली गाव तसंच इतर गावांमध्ये तब्बल वीस ते पंचवीस मिनिटं गारपीट झाल्याची माहिती आहे..

जालना जिल्ह्यातल्या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्याला गारपीटीनं झोडपून काढलंय. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी, हसनाबाद, पारध, दानापूर, रेणुकाई पिंपळगाव परिसरात रात्रीच्या वेळेला वादळी वारा आणि विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळं ज्वारी गहू बाजरी मका पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर जाफराबाद तालुक्यात तुफान गारपीट झाल्याचं बघायला मिळालं.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!