भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

जि. प. कनिष्ठ अभियंता व वरिष्ठ सहाय्यक लाच स्वीकारताना एसीबी च्या जाळ्यात

Monday To Monday Newsnetwork।

जळगाव (प्रतिनिधी)। स्वच्छ भारत योजने अंतर्गत बांधलेल्या शौचालयाचे बील मंजूर करण्यासाठी लाच मागणारा जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता अरूण जगन्नाथ चव्हाण आणि वरिष्ठ सहाय्यक योगेश बापू बोरसे यांना आज एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली .

मिळालेली अधिक माहिती अशी की, खेडी प्र. अ. तालुका अमळनेर येथील तक्रारदाराने स्वच्छ भारत योजनेच्या अंतर्गत शौचालयांचे बांधकाम केले होते. या बांधकामाचे बीले काढण्यासाठी त्याने जिल्हा परिषदेचे अभियंता अरूण जगन्नाथ चव्हाण आणि वरिष्ठ सहाय्यक योगेश बापू बोरसे यांच्याकडे पाठपुरावा केला असता यावेळी त्याला बील देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. यानंतर त्याच्याकडे चव्हाण यांनी बील काढण्यासाठी २० हजार तर बोरसे याने बील तयार करण्यासाठी पंधराशे रूपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारी नंतर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पथक तयार केले. जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, अमळनेर येथे या पथकाने सापळा लावत अरूण जगन्नाथ चव्हाण, वय-५७, व्यवसाय- कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.मराठा कॉलनी,अमळनेर ता.अमळनेर आणि योगेश बापू बोरसे, वय-४२, व्यवसाय- वरीष्ठ सहाय्यक, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर ,रा.प्रताप मिल, कंपाऊंड, अमळनेर ,वर्ग-३ या दोघांना अनुक्रमे २० हजार आणि पंधराशे रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक करण्यात आली.ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक निलेश लोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्दन चौधरी,, पोना.मनोज पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्‍वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!