क्राईमजळगाव

‘PFI’ शी संबंधित जळगाव मधील एकास दहशतवाद विरोधी पथकाकडुन अटक

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ‘ PFI ‘ म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया शी संबंधित एकाविरुद्ध जळगाव एटीसीने कारवाई करत अटक आहे. उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव), असे या संशयित व्यक्तीचे नाव आहे. पटेल विरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नसून सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

जळगाव दहशतवाद विरोधी शाखा, एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या यांच्या संयुक्त पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधित उनैस उमर खय्याम पटेल (वय ३१, रा.अक्सा नगर, जळगाव) याला पहाटे साडे तीन वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. त्याच्यासोबत शहाद्याचा एक तरुण होता. चौकशीअंती त्याला सोडून देण्यात आले होते. तर पटेल याला सीआरपीसी १५१ (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करत कोर्टात हजर करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.

दरम्यान, २२ सप्टेबर रोजी दहशतवादी विरोधी पथकाने (एटीसी)मेहरुणमधील दत्त नगरातील एका धार्मिकस्थळावर छापा टाकून अब्दुल हद्दी अब्दुल रौफ (वय ३२,रा.रमहेमान गंज, जालना) याला ताब्यात घेतले होते. अब्दुल हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेचा महाराष्ट्रातील खजिनदार तसेच जालना जिल्ह्याचा सोशल मिडिया प्रमुख होता. दरम्यान, आता पटेल याला पहाटेच ताब्यात घेण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!