जळगाव जिल्ह्यातील आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जाळगाव जिल्ह्यातील मुदत संपलेल्या आठ कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर अखेर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.
मागील दोन वर्षांच्या कोरोना काळात कोरोनाचा संसर्ग वाढू नये या साठी शासनाने सर्वच निवडणुकांना स्थगित्या देत संस्थांवर प्रशासक बसविले तर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा संचालक मंडळाचा कार्यकाळ वाढऊन २३ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.परंतु आता दिलेली मुदतवाढ ही संपल्याने जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल,रावेर, जामनेर, बोदवड,पारोळा, चोपडा या आठ कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहायक निबंधकांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.