लॉजवरील कुंटणखान्यात महिलांसह पुरुषांना अटक
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भजे गल्ली परिसरात असलेल्या चोपडा मार्केट मधील एका लॉजवर सुरू असलेल्या कुंटनखान्यावर मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत ५ महिलांसह ४ पुरुषांना ताब्यात घेतले.
भाजेगल्ली परिसरातील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खात्रीशीर माहिती घेत चोपडा मार्केट येथे रवाना केले. यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटरद्वारे आत गेले असता, त्या ठिकाणी ५ महिला व काही पुरुष असल्याचे आढळून आले. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मंगळवार १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता छापा टाकून ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. त्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आणून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांनी केली आहे.