विद्यापीठाच्या बहिस्थ परीक्षाकला ५ हजाराची लाच घेताना एसीबी कडून अटक, जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव,मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। विद्यापीठाच्या बहिस्थ परीक्षकाला ५ हजाराची लाच घेताना नाशिक च्या एसीबी पथकाने रंगेहात अटक केली.
तक्रारदार यांच्या पत्नी प्रियंका ह्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप (Bachelor of Library) ची अंतिम परीक्षा देत आहेत. सदर परीक्षेचे पेपर्स हे अमळनेर प्रताप महाविद्यालय येथे सुरू आहेत. तक्रारदार यांची पत्नी प्रियंका व त्यांच्या सोबतच्या एकूण ८ विद्यार्थ्यांना विजय गुलाबराव पाटील, वय ५० वर्ष धंदा – बहिस्थ परीक्षक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, हे पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देतात व त्यांना त्रास न देता सहकार्य करण्यासाठी विजय पाटिल हे तक्रारदार यांचेकडे प्रत्येक विषयासाठी १००/- रू असे एकूण ९ विषयाचे मिळून प्रत्येक विद्यार्थ्याकडे ९००/- रू असे एकूण ७२००/- रुपयाची लाचेची मागणी करत होते. याबाबत तक्रारदार यांनी अमळनेर येथे दिलेल्या तक्रारीवरून आज दिनांक २/६/२०२३ रोजी विजय गुलाबराव पाटील वय ५० वर्ष धंदा – बहिस्थ परीक्षक, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ रा. सिद्धिविनायक कॉलनी, घर नंबर १७१, अंमळनेर, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव. यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडी अंती ५६००/- रु ची लाचेची मागणी करून त्यापैकी तक्रारदार यांनी दिलेली ५०००/- रुपये रक्कम लाच म्हणून स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध अमळनेर पो स्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
ही करवाई नाशिक येथिल एसीबी पथकाने केली,त्यात अनिल बडगुजर, पोलीस उप आधीक्षक, ला.प्र.वि.नासिक. राजेन्द्र गिते, संदीप बत्तिसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे सर्व नेमणूक ला.प्र.वि.नासिक हे होते.