भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावशैक्षणिक

टिईटी घोटाळ्यातील जिल्ह्यातील आणखी तब्बल ८५ बोगस शिक्षकांच्या मान्यता रद्द

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। नुकतेच जळगांव जिल्ह्यातील टीईटी घोटाळा प्रकरणी ७१ बोगस शिक्षकांचे वेतन रोखण्यात आले असताना पुन्हा तब्बल ८५ शिक्षकांच्या बोगस मान्यता रद्द करण्यात आल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राज्यभरात गाजत असलेल्या टिईटी घोटाळ्याची पाळेमुळे जिल्ह्यात रूजलेली असून अलीकडेच याच प्रकरणात ७१ शिक्षकांचे वेतन रोखण्यात आलेले आहे. तोच ८५ शिक्षकांच्या मान्यता रद्द केल्याने आता बोगस शिक्षण मान्यतेतही जळगावचे नाव झळकले.

जळगाव जिल्ह्यात २०१५ ते २०१९ या कालखंडात एकूण साडेसातशे शिक्षकांना मान्यता प्रदान करण्यात आली होती. यातील अनेक शिक्षकांनी निकष पूर्ण न करतांनाही त्यांना ऍप्रुव्हल देण्यात आल्याचे आरोप करण्यात आले होते. यात मोठी आर्थिक उलाढाल होऊन मोठा गैरव्यवहार होत असतो, याबाबत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित केला होता.या मागणीनंतर संशयास्पद वाटणार्‍या ३०० शिक्षकांची सुनावणी घेण्यात आली. यातील तब्बल ८५ शिक्षकांची मान्यता बोगस आढळून आल्याने रद्द करण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण नाशिक यांनी या कारवाईला दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!