सहाय्यक फौजदार लाच घेताना जळगाव लाचलुचपत विभागच्या जाळ्यात
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दुचाकी सोडणे व गुन्हा दाखल न करणे या बदल्यात १५ हजारांची लाच घेतांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचा सहाय्यक फौजदार शिवाजी ढगू बाविस्कर याना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
अधिक माहिती अशी की, २३ ऑगस्ट बुधवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तक्रारदाराचा भाऊ आणि त्याचा मित्र असे दोघे दुचाकीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासून गावाजवळून जात आसतांना चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार शिवाजी ढगू बाविस्कर यांनी त्याची गाडी अडवून तुमच्याजवळ गांजा आहे. मी गांजाची केस करतो, तुम्हाला दुचाकी सोडवायची असेल आणि गांजाची केस होऊ द्यायची नसेल तर प्रत्येकी ७५ हजार असे एकुण दीड लाख रुपये द्यावे लागतील.
अशी दीड लाखाची मागणी केली असता शेवटी तडजोडीअंती सकाळी ४ वाजता तक्रारदारच्या नातेवाईकांकडून सुरूवातील ३० हजार रूपये घेतले. त्यानंतर दुचाकी ठेवून घेतली. दुचाकी सोडवायची असल्यास पुन्हा २० हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी सहाय्यक फौजदार बाविस्कर यांनी केली. त्यानंतर तडजोडी अंती १५ हजार रूपये देण्याचे ठरविले.
दरम्यान, तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाला तक्रार दिली. त्यानुसार आज शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी दुपारी चोपडा शहरात सापळा रचून तक्रारदार यांचेकडून १५ हजार रूपये घेतांना सहाय्यक फौजदार शिवाजी ढगू बाविस्कर वय ५२ वर्ष ,सहाय्यक फौजदार चोपडा याना अटक केली. चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई लाच लुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख, यांनी केली पथकात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन,.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर,बाळू मराठे, राकेश दुसाने,पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.प्रणेश ठाकुर. पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.सचिन चाटे हे होते.,