विवाहितेचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एका २५ वर्षीय महिलेला जबरजस्ती तिच्या घरात घुसून व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली
या बाबत अधिक माहिती अशी की, शुभम अशोक पाटील,रा. घुमावल बुद्रुक ता.चोपडा ,याने २५ मार्च रोजी पंचवीस वर्षीय महिला हि घरात एकटी असतांना रुममध्ये अनाधिकृतपणे प्रवेश करुन महिलेचे तोंड दाबुन व्हीडीओ कॉल करुन काढलेले व्हीडीओ व फोटो व्हॉटसअँपवर टाकुन बदनामी करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले.तसेच दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता शुभम अशोक पाटील व प्रफुल्ल दिलीप पाटील यांनी महिला घरात एकटी असतांना प्रवेश करुन महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत
असता सदर महिलेने आरडा ओरड केल्यावर दोघे पळुन गेले.महिलेने पती, सासू, सासरे यांना सांगितले असता सदर कृत्या बाबत जाब विचारण्यासाठी सासु, सासरे गेले होते. यावेळी शुभम पाटील व प्रफुल्ल पाटील यांनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली.या बाबत महिलेने चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शुभम अशोक पाटील, प्रफुल्ल दिलीप पाटील या दोघांविरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.