बीडीओ ची ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी ; छळास कंटाळून घेतल्या होत्या झोपेच्या गोळ्या
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ग्रामसेविकेचा वारंवार छळ करत शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (बिडीओ) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्या ने मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,पारोळा तालुक्यातील एका ग्रामसेविकेकडे दोन गावांचा पदभार असून त्या आपल्या पदावर काम करत असतांना दि.१२ डिसेंबर २०२१ पासून रुजू झालेले गटविकास अधिकारी विजय दत्तात्रेय लोंढे (वय ४४) रा. जळगाव यांच्याकडून ग्रामसेविकेचा वारंवार छळ केला जात होता.
गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेला आपल्या दालनात बोलून चित्र विचित्र प्रकारे हावभाव करत आपल्याजवळ खेचण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामसेविकेच्या लक्षात आल्यावर तिने गटविकास अधिकारी यांना सांगितले की, मी त्यातली नाही, मी माझ्या पतीला सांगेल. त्यावर गटविकास अधिकारी यांनी तू जर कोणाला सांगितले तर, मी तुला बदनाम करून टाकेल असे धमकी दिली यानंतर देखील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या दिवशी गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविकेस कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बाबत जाब विचारण्यासाठी गेली असता गटविकास अधिकाऱ्यांने त्या महिला ग्रामसेविकेस अजुन वेळ गेली नसल्याचे सांगितले. बीडीओ च्या प्रकारास कंटाळून ग्रामसेविकेने झोपेच्या गोळ्या घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न सुद्धा केला होता त्यात तिची प्रकृती बिघडली होती . अखेर ग्रामसेविकेने दिनांक ०८ शनिवार रोजी पारोळा पोलिस स्टेशनमध्ये बिडीओ विजय दत्तात्रय लोंढे (वय ४४) रा. जळगाव विरुद्ध तक्रार दिल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.