भुसावळराजकीय

जळगाव जिल्ह्यात खडसेचा करिश्मा, नगरसेविकांच्या आप्तांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देताच आता आपली पॉवर दाखवण्यास सुरुवात केली आहे. यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे. कारण, त्यांच्या समर्थकांनी ‘भाजप’ला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरू केला आहे. त्यामुळे ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी हा पहिला मोठा धक्का मानला जात आहे.

आजच पक्षांतर केले तर अपात्रतेसह अन्य तांत्रिक बाबींची कटकट मागे लागू शकते. यामुळे आजवर शहरातून कुणी राष्ट्रवादीत प्रवेश केला नव्हता. तथापि, आज जळगावातील परिवार संवाद कार्यक्रमात नगरसेवक व नगरसेविकांच्या आप्तांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्षांसह बहुतांश नगरसेवक हे एकनाथराव खडसे यांचे समर्थक असल्याची बाब सर्वसृत आहे. यात नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या पत्नी तर नगरसेविकांच्या पतींचा समावेश आहे. तर स्वीकृत नगरसेवक तथा नाथाभाऊंचे कट्टर समर्थक प्रा. सुनील नेवे यांनी देखील राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला .

तसेच भाजपचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ.भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी नगसेवक दत्तू सूरवाडे, हेमलता इंगळे, माजी नगरसेवक राहुल मकासरे, नगरसेविका पती-प्रशांत अहिरे, किशोर पाटील, वसंत पाटील, माजी भाजप अध्यक्षा पुरूषोत्तम महाजन, आशिक मुन्ना तेली, माजी नगरसेविका सोनल महाजन, नगरसेविका पत्नी-सौ.पौर्णिमा प्रमोद नेमाडे, प्रिया बोधराज चौधरी, शालिनी भागवत कोलते, प्रिती मुकेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष शेख शफी शेख अजीज, शहर भाजपचे माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी पं.स.सदस्य प्रभा सपकाळे, दर्शन चिंचोले, एजाज खान खलील खान, आरती दिनेश नेमाडे, अनिकेत सुधीर पाटील, आशिष महाजन, पृथ्वीराज पाटील, विनय बऱ्हाटे, सुमित बऱ्हाटे, यशांक पाटील, माजी नगरसेवक किरण महाजन, निलेश वारके, नगरसेवक पत्नी चैताली अमोल इंगळे, प्रशांत नरवाडे, गणेश पाटील, संघदीप नरवाडे, माजी नगरसेवक शेख चिराग शेख गुलाब, जलील कुरेशी, शेख पापा शेख कालू, शेख निवाम शेख निमामुद्दीन, इस्माईल अकबर मेनन, अजीम खान खलील खान, आफताब खान, मो अमीन मो बिसार कुरेशी, शेख शब्बीर शेख इस्माईल, बिस्मीला तडवी, हसनूददीन पेंटर, रहेमूदीन, शेख रउप शे गनी, डॉ. निलेश झोपे, अब्बास शाह, रहीम शाह, वासीम खान आजीम खान, झाकीर खाटीक, रेहान कुरेशी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ३१ जणांनी प्रवेश केला मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कार केला. यामुळे इन-डायरेक्टर पध्दतीत नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार संजय सावकारे यांचे कट्टर समर्थक समजले जाणार्‍या युवराज लोणारी, राजू आवटे, राजेंद्र नाटकर, पिंटू कोठारी आदी नगरसेवकांच्या आप्तांंनी मात्र भाजपमध्येच राहणे पसंत केले आहे.एकीकडे नगरपालिकेतील तब्बल १८ नगरसेवकांच्या आप्तांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!