मोबाईल अँपच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सव्वा ७ लाखांचा गंडा
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगांव (प्रतिनिधी)। भुसावळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला एका अज्ञात व्यक्तीने बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड बंद होत असल्याचे भासवत अँपच्या माध्यमातून ७ लाख २० हजार रूपयांना ऑनलाईन फसवणूक करत गंडावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडू मिळालेली माहिती अशी की, भुसावळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी गणेश लक्ष्मण नेमाडे यांना व्हॉटसॲपवर एका अनोळखी नंबरवरून मॅसेज आला त्या म्हटलं होतं बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड बंद होत असून सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा या आशयाचा मॅसेज आल्याने सदरील नंबर वरती नेमाडे यांनी फोन केला असता त्या अनोळखी व्यक्तीने आपणं बीएसएसएन कंपनीतून बोलत असल्याचे भासवत आपले सिमकार्ड बंद होणार असून सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला रिचार्ज करावे लागेल, त्यासाठी त्याने नेमाडे यांना प्ले स्टोअरमधून एक ॲप डाऊललोड करण्यास सांगितले व त्या ॲपच्या माध्यमातून त्या अनोळखी व्यक्तीने नेमाडे यांच्या मोबाईलचे ऑनलाईन हॅक करत त्यांच्या एसबीआय बँकेच्या खात्यातून तब्बत ७ लाख २० हजार रूपये लंपास करत फसवणूक केली व फोन कट केला. हा सर्व प्रकारात आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे नेमाडे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लागलीच जळगावातील सायबर पोलीसात धाव घेत संबंधित अनोळखी व्यक्तीच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.