भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

मोठी बातमी ; जळगाव जिल्हा दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. ३ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याला सुरुवात होणार आहे. दूध संघासाठी दि. १० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या चौकशीवरुन राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसे व भाजपाचे मंगेश चव्हाण यांच्यात घमासान सुरु आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. तथापि, एकनाथ खडसे यांनी न्यायालयात जाऊन याला स्थगिती मिळविली. यानंतर दूध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणावरून प्रचंड आरोप-प्रत्यारोप झालेत. यावरून एकनाथराव खडसे यांनी थेट पोलीस स्थानकाच्या आवारातच रात्रभर झोपून आंदोलन केल्याने राज्यभरात याबाबत उत्सुकता निर्माण झाली.तर दुसरीकडे राज्य सहकारी निवडणुक प्राधिकरणाच्या मंजुरीने दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.


असा आहे निवडणुक कार्यक्रम नामनिर्देशन पत्र दाखल करणे दि. ३ ते १० नोव्हेंबर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत, निवडणुक कार्यालय दूध संघ, नामनिर्देशन पत्रांची छाननी- दि. ११ नोव्हेंबर, वैध नामनिर्देशन पत्र जाहीर करणे- दि. १४ नोव्हेंबर, नामनिर्देशन पत्र माघार- दि. १४ ते २८ नोव्हेंबर, अंतीम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप- दि. २९ नोव्हेंबर, मतदान- दि. १० डिसेंबर सकाळी ८ ते ४ या वेळेत, मतमोजणी- दि. ११ डिसेंबर सकाळी ८ वाजेपासून

मतदार संघनिहाय जागा
खुला प्रवर्ग (तालुका निहाय) १५ महिला राखीव-२, इमाव-१, अ.जाती-जमाती १, विजाभज व विमाप्र-१ एकूण २०, असे मतदार संघनिहाय उमेदवार निवडुन द्यावयाचे आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!