मोठी बातमी; देश भरात NIA ची छापमारी,जळगाव मधून एकास अटक
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा अर्थात NIA ने देशातील विविध राज्यात टाकलेल्या छापेमारीत १०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. यात जळगावमधून एकाला अटक करण्यात आल्याच्या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा अर्थात NIA आणि ईडीने तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बिहार, नवी दिल्ली आणि आसाम यासह १२ राज्यात छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात देखील २० ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. यात जळगावात टाकण्यात आलेल्या छापेमारीत एकाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती जालना येथील असून तो काही दिवसांपासून जळगावात लपून बसलेला होता. अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय 32 , रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) असे सदर व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. 21/2022 कलम 121-A, 153-A, 120-ब, 109 भा.द.वि.सहकलम 13(1) (ब) UAP ACT प्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच हा व्यक्ती पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे.