मोठी बातमी : कुंटणखान्यावर छापा, ४३ महिला पोलिसांच्या ताब्यात
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापेमारी करत ४३ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील ३६ तरुणींची जळगाव महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून सात महिलांवर चोपडा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई चोपडा उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे सहायक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या पथकाने केली.
शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील परिसरात अवैधरीत्या कुंटनखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांनी पथकासह दुपारी २ वाजेच्या सुमारास कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यात जिल्ह्यातील तसेच परराज्यातील ४३ तरुणी आढळून आल्या. त्यातील ३६ तरुणींना जळगाव सुधारगृहात पाठवण्यात आले असून कुंटणखाना चालवणाऱ्या सात महिलांवर रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.