भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

मोठी बातमी ; एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील या दोघांमध्ये आपसात समझोता

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। माजीमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे यांनी पालक मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याविरोधात पाच कोटी रूपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात खडसेंवर घोटाळा केल्याचा आरोप केला होता. दोघांच्या गैरसमजूतीतून हा प्रकार झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये आपसात तडजोड व समझोता झाल्याने न्यायालयाने दोघांकडून लेखी घेत खटला मागे घेण्यात आला.

२०१६ मध्ये गुलाबराव पाटील यांनी एका भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येठ नेते आ. एकनाथ खडसे हे मंत्री असताना त्यांच्या विरोधात घोटाळा केल्याचा आरोप केला होता. याबाबत एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा न्यायालयात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरुद्ध ५ कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या दाव्यात तारखेवर एकदा मंत्री गुलाबराव पाटील हे गैरहजर राहिले तर दुसऱ्या तारखेवर एकनाथ खडसे व गुलाबराव पाटील हे दोघेही गैरहजर झाले होते. न्यायालयाने दोघांना प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड सुद्धा केला होता. परंतु आज मंगळवारी २७ जून रोजी सकाळी ११ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात तारीख होती या तारखेला गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे दोन्हीही नेते हजर असल्याचे पाहायला मिळालं. न्यायालयात अब्रू नुकसानीच्या दाव्या संदर्भात आज सुनावणी सुरू झाली तेव्हा एकनाथ खडसे व मंत्री गुलाबराव पाटील या दोघांनी आमच्या दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात येत असल्याचे लेखी नोंदवून घेण्यात येऊन हा खटला मागे घेण्यात आला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!