म्हाडा परीक्षां घोटाळ्यात कोट्यवधींची उलाढाल? ऍड. विजय दर्जीला एक जून पर्यंत कोठडी
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पुणे सायबर पोलिसांच्या तपासात म्हाडाच्या चार प्रवर्गांतील परीक्षांचे पेपर फोडण्यासाठी कोट्यवधींची उलाढाल झाल्याचे याआधीच समोर आले आहे. याप्रकरणी जळगावच्या ऍड. विजय दर्जीला पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने बुधवारी ताब्यात घेतले. व दर्जीच्या कार्यालयाची तपासणी केली असता पोलिसांनी दोन म्हाडाचे प्रवेश पत्र जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली.म्हाडाचे
पेपर देण्याच्या बदल्यात एजंटाकडे एका परिक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरविण्यात आला होता.हा एजंट चा रेट होता , मग एजंट संबंधीत परिक्षार्थीमागे किती लाख रुपये घेणार, हे त्या एजंटवर अवलंबून होते.अशी धक्कादायक माहिती समोर आली. टीईटी घोटाळ्याच्या तपासातूनच म्हाडाच्या परीक्षेतील घोटाळा समोर आला,आरोग्य विभाग, म्हाडा, टीईटी किंवा इतर शासकीय परीक्षांमधील पेपर फोडणारे सर्व भामट्यांचे एकमेकांशी लागेबांधे असल्याचे यानिमित्ताने समोर येत आहे. टीईटी घोटाळ्यात बीडचा मुख्य संशयित राजेंद्र सानपला अटक केल्यानंतर सानप हा जळगावच्या विजय दर्जी याच्या संपर्कात असल्याचे समोर आले होते.
पोलिसांनी दोघांचे मोबाईलचे सीडीआर काढले असता दर्जी आणि सानप हे एकमेकाच्या संपर्कात असल्याचे फोन रेकॉर्डवरून उघड झाले. त्यामुळे सानपच्या अटकेनंतर पुणे पोलिसांनी दर्जीकडे लक्ष केंद्रित केले. काही दिवस सर्व माहिती गोळा केल्यानंतर दर्जीला बुधवारी त्याच्या गोलाणी मार्केटस्थित ऑफिसमधून ताब्यात घेण्यात आले. दर्जीला अटक केल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली
विजय दर्जी मुख्य आरोपी राजेंद्र सानपचा एजंट विजय दर्जीला ताब्यात घेण्यापूर्वी कार्यालयाच्या झाडाझडतीतून दोन म्हाडाचे दोन प्रवेश पत्र जप्त करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तसेच पोलीस चौकशीत याहून अधिकची खळबळजनक माहिती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या चौकशीत दर्जी आणि सानप एकमेकाच्या संपर्कात होते. एवढेच नव्हे तर ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांच्याही दर्जी संपर्कात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आल्याचे कळतेय. विजय दर्जी हा राजेंद्र सानपचा एक एजंट असल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. जीए सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख याने म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी जवळपास १० एजंटांशी संपर्क केला होता.
त्यांच्यामार्फत तो पेपर फोडण्याचा त्याचा कट असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या एजंटांनी परीक्षार्थींशी संपर्क साधून त्यांना पेपर कोरा सोडण्यास सांगण्यात येणार होते. त्यानंतर ओएमआरशीटमध्ये देशमुख फेरफार करुन त्या परिक्षार्थींना पास करण्यात येणार होते. हा त्यांचा बदलेला प्लॅन होता. दरम्यान, देशमुख याने पेपर देण्याच्या बदल्यात एजंटाकडे एका परिक्षार्थीमागे दहा लाखांचा रेट ठरवला. मग एजंट संबंधीत परिक्षार्थीमागे किती पैसे घेणार, हे त्या एजंटवर अवलंबून होते.अशी माहिती समोर आली .