जळगाव जिल्हा भाजपा पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारणी जाहीर
जळगाव (प्रतिनिधी)। भाजपचे जिल्हाध्यक्ष आ.राजू मामा भोळे यांनी जळगाव जिल्हा ग्रामीण भाजपची जंबो कार्यकारिणी जाहीर केली आहे.
भाजपा नेते तथा माजी जलसंपदा मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीण ची जम्बो कार्यकारणी जाहीर केली असून यामध्ये १३ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ११ चिटणीस, १ कोषाध्यक्ष, १ कार्यालय मंत्री, कायम निमंत्रित ६० सदस्य असा समावेश आहे.
जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी पी.सी.पाटील, पद्माकार महाजन, नंदकिशोर महाजन, अजय भोळे, शरद महाजन, डॉ.विजय धांडे, राकेश पाटील, डी.एस.चव्हाण , के.बी.साळुंखे, कांचन फालक, सौ.रेखा चौधरी, हरीभाऊ चौधरी यांचा समावेश आहे. सरचिटणीस पदी हर्षल पाटील, सचिन पानपाटील, मधुकर काटे, चिटणीस पदी नवलसिंग राजपूत, सौ.कविता महाजन, सौ.सविता भालेराव, अॅड.प्रशांत पालवे, राजेंद्र चौधरी, संतोष खोरखेडे, सौ.रंजना नेवे, रविंद्र पाटील, सौ.मेघा जोशी, सोमनाथ पाटील, सौ.शैलेजा चौधरी यांची नियुक्ती तर सोबत कोषाध्यक्ष पदी अनिल खंडेलवाल, कार्यालय मंत्री पदी गणेश भगवान माळी यांना जबाबदारी देण्यात आली असून ६० कार्यकारणी सदस्य अशी जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन, खा.रक्षाताई खडसे, खा.उन्मेष दादा पाटील, आ.संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण, आ.चंदूभाई पटेल, महाराष्ट्र राज्य जनजाती संपर्क प्रमुख किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष आ,राजू मामा भोळे, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर यांनी अभिनंदन केले.