जिल्हा सहकारी दूध संघावरील प्रशासक मंडळ बरखास्त, संचालक मंडळच कायम
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्हा सहकारी दूध संघावर राज्य सरकार कडून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती,सरकारने नेमलेल्या या प्रशासक नेमणूकीच्या विरोधात हायकोर्टात गेलेल्या संचालक मंडळाला कोर्ट कडून मोठा दिलासा देत प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यामुळे पुन्हा खडसेंचे वर्चव कायम राहणार आहे
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेत, राजकीय हेतूने आ.गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्री यांनी समिती नेमली आहे. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केले जात आहे. संचालक मंडळ बरखास्त करायचे होते, तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते,असे खडसे यांनी म्हटले होते, दूध संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून न्यायालयाने दि.३० सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सहकाराच्या एका नियमानुसार निवडणूक होईपर्यंत संचालक मंडळ कार्यरत राहू शकते.असे खडसे यांनी म्हटले होते.
दरम्यान खडसे यांच्या दाव्यानुसारच हायकोर्टाने आज प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यांचे पाटील यांची त्रयस्थ अर्जदार म्हणूनची याचिका फेटाळली आहे. तर सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी मागितलेली चार आठवड्यांची मुदत देखील कोर्टाने अमान्य केली.हायकोर्टाने प्रशासक मंडळ नियमबाह्य असल्याचे सांगत ते बरखास्त केले आहे. तसेच कोर्टाचे आदेश मिळाल्याबरोबर संचालक मंडळ आपला पदभार स्वीकारणार आहे. खंडपीठाने निकाल दिला असून प्रशासक मंडळ बाजूला सारत पुन्हा संचालक मंडळ कायम केले आहे. आ.एकनाथराव खडसे यांनी ‘मंडे टू मंडे न्यूज’सोबत बोलताना वृत्ताला दुजोरा दिला आहे.