ब्रेकिंग ; जळगाव जिल्ह्यात निवडणूक निकालानंतर राडा,३२ वर्षीय भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक निकालांनंतर जल्लोष सुरु असतानाच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. शाब्दिक वादानंतर दोन समुहांकडून परस्पर दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकारात एक भाजपचा (BJP) कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर विजयी मिरवणुकीत देव दर्शना साठी जात असताना दोन गट आपसात भिडले त्या झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या धनराज श्रीराम माळी (वय ३२ वर्ष) नावाच्या भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला