कारागृहातील दोन महिला पोलीस अंमलदारांसह सुभेदार एसीबी च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव कारागृहातील दोन महिला अम्मलदार सह एका सुभेदाराला दोन हजाराची लाच घेताना धुळे एसीबी पथकाने रंगेहात पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराचा संबंधित संशयित आरोपी जिल्हा कारागृहात असून त्याची भेट घेण्यासाठी महिला पोलीस अंमलदारकडून दोन हजार रुपयांची लाच मागितली गेली या बाबत धुळे एसीबी कडे तक्रार नोंदवली गेली त्यानुसार आज दि ८ नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी दीड वाजता हेमलता गायबू पाटील, जेल कॉन्स्टेबल, पूजा सोपान सोनवणे, पद जेल कॉन्स्टेबल, भीमा उखडु भिल, पद सुभेदार, सर्व नेमणूक जळगाव जिल्हा मध्यवर्ती कारागृह जळगाव या दोन महिला अंमलदार व एका सुभेदाराला धुळे एसीबीने ताब्यात घेतले.
जळगाव कारागृहात आरोपींच्या भेटीसाठी पैसे मगितल्याच्या तक्रारी होत्या.धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक खांडवे व पथकाने ही कारवाई केली.