ब्रेकिंग : जळगाव डीडीआर कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी एसीबी च्या जाळ्यात
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आज लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने कारवाई करत एका कर्मचार्यास लाच स्वीकारतांना रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आज शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तक्रारदारा विरोधात अवैध सावकारीचा गुन्हा दाखल होवू न देणे तसेच प्रकरणाच्या प्रती देण्यासाठी व नाशिकच्या अपिलात मदत करण्यासाठी दहा हजारांची मागणी करून ती स्वीकारणार्या जळगाव सहकार निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी शशीकांत नारायण साळवे यास कार्यालयातच रंगेहात पकडत जळगाव एसीबीने अटक केली.
शशिकांत साळवे याच्या अटकेन सहकार क्षेत्रातील लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव,बाळू मराठे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने आदींच्या पथकाने सापळा रचून यशस्वी केला.