ब्रेकिंग : जळगावच्या तरुणाचे पाकिस्तान कनेक्शन, गोपनीय माहिती पुरवण्याच्या आरोपावरून अटक
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पाकिस्तानला प्रतिबंधित क्षेत्राची गोपनीय माहिती पुरवण्याच्या आरोपावरून नैदलात काम करणाऱ्या जळगाव येथील रहिवासी असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली असून या बाबत काल रात्री एटीएसचे पथक चौकशी करण्यासाठी जळगावला होते. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी गुप्तहेराला प्रतिबंधित क्षेत्राची माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातून २३ वर्षीय गौरव पाटील या तरुणाला अटक केली, या तरूणाने नोवल डॉकमध्ये कार्यरत असतांना एप्रिल-मे ते ऑक्टोबर महिन्यात पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सऍप वर तो संपर्कात होता. एटीएसने चौकशी केल्यानंतर चार जणांना अटक केली आहे. गौरव पाटील याला १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवल्याचा संशय आहे.
२३ वर्षीय गौरव पाटील नोवल डॉक येथे कामाला होता. गौरव पाटील हा मागील चार ते पाच महिन्यांपासून पाकिस्तानी गुप्तहेराच्या फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून संपर्कात होता. त्याने माहितीच्या बदल्यात ऑनलाईन पैसे स्विकारल्याचेही एटीएसला आढळून आले आहे.
याच प्रकरणात आणखी तीन जणांची भूमिका संशयास्पद आढळून आली असून एटीएसने गौरव पाटील याच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, या प्रकरणात गौरव पाटलासह इतरांना हनी ट्रॅपमध्ये अडकावून त्यांच्याकडून पाकच्या गुप्तचर यंत्रणेने माहिती मिळवल्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली असून या दिशेने चौकशी सुरू आहे. गौरव पाटील हा मूळचा जळगाव येथील रहिवासी असून त्याची चौकशी करण्यासाठी काल एटीएसचे पथक जळगावात आले होते. या पथकाच्या हाती काय महत्वाची माहिती लागली या बाबत स्पस्ट झाले नसून त्याची चौकशी सुरू आहे.