भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

लाच भोवली : जळगाव जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ लिपीक एसीबीच्या जाळ्यात !

जळगाव, मंडे टू मंडे वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांला नोकरीसाठी ऍप्रुव्हल देण्याकामी २ लाख ३० हजार रूपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने आज गुरुवारी सकाळी अटक केल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या भावाला जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात नोकरीच्या परवानगी देण्यासाठी २ लाख ३० हजार रूपयांची मागणी वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांच्या कडून करण्यात आली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. यानुसार सापळा रचून आज माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे यांना रंगेहात अटक करण्यात आल्याने जिल्हा परिषदेतील लाचखोरीचे पितळ पुन्हा चव्हाट्यावर आले आहे.

ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, प्रभारी अपर अधीक्षक सतीश डी.भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस. पाटील, पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव, सहा.फौजदार दिनेशसिंग पाटील, सहा.फौजदार सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, हवालदार शैला धनगर, पोलीस नाईक मनोज जोशी, नाईक सुनील शिरसाठ, पोलीस नाईक जनार्धन चौधरी, कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबलमहेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ आदींच्या पथकाने केली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!