पोलिसस्टेशन आवारातच लाच, पोलीस अंमलदारासह होमगार्ड
एसीबी च्या जाळ्यात
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। वाळूचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या चोपडा तालुक्यातील अडावद पोलीस स्थानकात पंटरला जळगाव एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारतांना रंगेहाथ ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचार्यालाही ताब्यात घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. कॉन्स्टेबल योगेश गोसावी व होमगार्ड चंद्रकांत कोळी असे आरोपींची नावे आहेत. लाचेची मागणी आज २८ जानेवारी ला केली व कारवाईही आजच करण्यात आली.
तक्रारदार यांच्या स्वतःचे नावे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर असुन ते वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. सदर ट्रॅक्टरने अडावद पोलीस स्टेशन हदीमध्ये तुला जर वाळू वाहतूक करायची असेल तर दरमहा आमचे साहेबांना ५०००/-रुपये द्यावे लागतील असे सांगुन तडजोडीअंती तक्रारदार यांचेकडे पोलीस अंमलदार यांनी पंचासमक्ष ४०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम पोलीस अंमलदार योगेश संतोष गोसावी, यांच्या सांगण्यावरून होमगार्ड चंद्रकांत काशिनाथ कोळी, यांनी अडावद पोलीस स्टेशनच्या आवारात पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले .
योगेश संतोष गोसावी, वय-३५ पोलीस अंमलदार/ब.नं.१८४०, नेमणुक-अडावद पोलीस स्टेशन. (वर्ग-३) रा.पोलीस वसाहत, शासकीय निवासस्थान, अडावद ता.चोपडा जि .जळगाव .चंद्रकांत काशिनाथ कोळी, वय-३६, व्यवसाय- होममार्ड रा.कोळीवाडा, अडावद ता.चोपडा जि .जळगाव,यांचे वर अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई एसीबीचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.सापळा पथकात शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. जळगांव. पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.सचिन चाटे,पो.कॉ.प्रणेश ठाकुर.यांचा समावेश होता.