अवैध मद्यविक्री केल्याने मद्यसाठ्यासह आरोपीला अटक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
चाळीसगाव (प्रतिनिधी)। येथील जवळच ओझर गावाच्या पुढे चाळीसगाव–भडगाव रोडला अवैधरीत्या मद्यविक्री केली जात असल्याचा खबर्याकडून मिळालेल्या माहिती वरून पोलिसांनी सदर ठिकाणी धाड मारत मुद्देमाला सह आरोपीला अटक केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन सुरू असल्याने किराणा दुकान, भाजीपाला आदी दुकाने सकाळी 7 ते 11 चा वेळ दिलेला असल्याने शहरातील आस्थापना बंद करण्यासाठी पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार ओझर गावाच्या पुढे चाळीसगाव ते भडगाव रोडला अवैधरीत्या मद्यविक्री सुरू असल्याची माहिती सकाळी 11 वाजेच्या सुमारास मिळल्याने पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या आदेशानुसार सपोनि विशाल टकले, फौजदार धर्मराज पाटील, चालक प्रकाश महाजन आदीं पथकाने सदर ठिकाणी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता सुमित अंबादास सोनावणे वय-26 रा. घाटरोड, ता. चाळीसगाव हा मद्य विकत असल्याचे आढळून आला, त्याच्या जवळून 1200 रुपये किंमतीच्या कॅनाॅन सुपर स्ट्राॅग बियरच्या 8 सिलबंद बाटल्या तसेच 250 रूपये किंमतीचे ट्युबर्ग स्ट्राॅग बियरच्या 2 सिलबंद बाटल्या असे एकूण 1450 रू किंमतीचे मद्याचा साठयासह सुमित सोनावणे याला अटक करण्यात आली असून पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास राकेश पाटील हे करीत आहेत.