जळगाव जिल्ह्यात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा I राज्यात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे, जळगाव मध्ये तर सर्वात जास्त तापमान असून वाढत्या तापमानामुळे उकाड्याने जळगावकर हैराण झाले असून अशातच हवामान खात्याने जिल्हातील काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे.
आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला असून या मुळे उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज शनिवारी दी.३ जूनला जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारपर्यंत उष्ण तापमान राहणार असून सायंकाळीनंतर वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात काही भागात ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.