उत्तर महाराष्ट्रासह राज्यात ” या ” दिवशी अवकाळी पावसाची शक्यता
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ऐतिहासिक व सर्वाधिक उष्ण ठरलेला मार्च हा महिना असून एप्रिल महिन्यातही अशीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या काही ठिकाणी कमी-जास्त उष्णता असताना राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात ५ एप्रिल राेजी तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हाेईल असा अंदाज भारत हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान शनिवार नंतर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील उष्णतेची लाट कमी हाेणार आहे. विदर्भात मात्र लाटेचा मुक्काम वाढला आहे. पुढील दाेन दिवस राज्यात हवामान काेरडे असेल तर ५ एप्रिल राेजी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस हाेऊ शकताे. ४ एप्रिल ते ६ एप्रिलदरम्यान राज्यात हवामान काही अंशी ढगाळ राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
तापमानाचा पारा स्थिर
जळगावात शुक्रवारी पारा ४१.८ अंश सेल्सिअस हाेते. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात तापमान ४१ ते ४२ अंशांदरम्यान स्थिर आहे. शनिवारनंतर तापमान ४० अंशांपर्यंत स्थिर राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.