भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

१ एप्रिल पासून जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत १ एप्रिल २०२३ पासून बदल करण्यात येणार आहे उष्माघात उपाययोजने अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांची वेळ आता सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत असणार असून असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी २७ मार्च रोजी जारी केले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी सूचना दिलेल्या आहेत. त्यात जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण असल्याने व ही बाब आपत्ती या सदरात येत असल्याने यापूर्वीच विविध उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत १ एप्रिलपासून सकाळी ७ ते दुपारी १ असा बदल करण्यात आला आहे. तसेच उष्माघाताची तीव्रता लक्षात घेऊन संबंधितांनी तत्काळ कार्यवाही करावी, सदर आदेश सर्व शाळांना बंधनकारक आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!