भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

चोपडाजळगाव

चोपड्याच्या आ.लताताई सोनवणे याची आमदारकी धोक्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघाच्या शिवसेनेच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांची जात प्रमाणपत्राबाबतची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे.

या बाबत अधिक महिती आशी की,राज्यात गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील चोपडा विधानसभा या राखीव मतदार संघातुन लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेने कडून अनुसूचित जमाती मधील टोकरे कोळी या जातीच्या प्रमाणपत्रावर निवडून लढवून त्या निवडूनही आल्या ,परंतु त्याच्या जातीच्या दाखल्याला पराभूत राष्ट्रवादीचे उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आक्षेप घेत नंदुरबारच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडे तक्रार दाखल केली जात प्रमाणपत्र तपासणी समितीने संबंधित प्रमाणपत्र अवैध ठरवले होते त्या नंतर समितीच्या या निर्णयाविरुद्ध आमदार लताताई सोनवणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जात प्रमाणपत्र वैध ठरवण्यासाठी आव्हान दिले होते,यावर सुनावणी होऊन यात जात प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरविलेल्या जात प्रमाणपत्राचा दिलेला निर्णय कायम ठेवला त्या मुळे आमदार लता सोनवणे याची आमदारकी धोक्यात आली आहे.या बाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्याच्या कडून सांगण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!