भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचोपडाजळगाव

आंतरजातीय विवाह; जावयासह गरोधर मुलीवर पित्याकडून हल्ला !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चोपडा (प्रतिनिधी) : येथील मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात ठेवून जावयासह मुलीवरच पित्यासह भावाने हल्ला केला. तालुक्यातील वर्डी येथे गुरुवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. या हल्ल्यात महिलेच्या हाताची बोटे कापली गेली असून ती गरोदर असल्याने डॉक्टर प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत तर जावईदेखील या हल्ल्यात जखमी झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, वर्डी येथील संतोष देवराम पाटील यांची कन्या जया ठाकरे हिने गावातील दिनेश ठाकरे यांच्याशी वर्षभरापूर्वी आंतरजातीय लग्न केले व गेल्या महिन्याभरापासून दोघे पुन्हा गावात राहण्यासाठी आले व मुलीने केलेल्या विवाहाचा राग मनात ठेवून मुलीचे वडील संतोष पाटील व भाऊ सुनील संतोष पाटील या दोघांनी जावई दिनेश ठाकरे यांच्यावर गावाबाहेर एकट्याला गाठून विळ्याने डाव्या हातावर व पाठीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दिनेशच्या घरी जाऊन दिनेशची पत्नी म्हणजेच पोटची मुलगी जया ठाकरे हिच्यावर वडील व भावाने विळा व हातोडीने डोक्याला व हाताला गंभीर जखमी केले. मुलीच्या हाताची बोटे कापली गेली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!