वीस हजाराची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। काम करून देण्यासाठी ४०,००० रुपयाची मागणी करून उर्वरित वीस हजाराची रक्कम स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा जि. धुळे येथील छाननी लिपिक सुशांत शामप्रसाद अहिरे यास आज जळगाव एसीबी पथकाने रंगेहात पकडून अटक केली.
तक्रारदार रा.संभाजी नगर, महाबळ रोड,ता.जि.जळगाव.
यांनी भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा जि. धुळे येथे त्यानी करार करून काम घेतलेल्या बेटावद गावातील ४ शेत जमिन गटाचे हद्द कायम पोट हिस्सा मोजणी करिता अती तातडीचे चलन भरुन शेत मोजणीचा अर्ज सादर केला होता.सदरचे काम करुन देण्यासाठी छाननी लिपिक सुशांत शामप्रसाद अहिरे, वय-३६, छाननी लिपीक, उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा ता. शिंदखेडा जि. धुळे वर्ग-३, यांनी तक्रारदार याना दि. ११/११/२२ रोजी ४०,०००/रुपयांची मागणी करुन त्याच दिवशी २०,००० रू रोख स्वीकारून उर्वरित २०,००० रू काम केल्यावर देण्यास सांगुन दिनांक १४/११/२२ रोजी व दिनांक ६/१/२३ रोजी पडताळणी दरम्यान २०,००० रू घेण्याची समंती दर्शवून आज रोजी २०,०००/ रू ची लाच स्विकारताना उप अधिक्षक,भूमी अभिलेख कार्यालय धुळे येथे स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे.
त्यांचे वर धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. एसीबी चे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि.एन.एन.जाधव, ला प्र वि जळगांव. पो.नि.संजोग बच्छाव ASI.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,पो. ह.अशोक अहिरे,पो.ना. ईश्वर धनगर,बाळू मराठे,पो.ना. महाजन पोकॉ.अमोल सूर्यवंशी,पो. कॉ. प्रणेश ठाकूर यांनी या कारवाई केली आहे.