भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

सहकार व सहाय्यक सहकार अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। घर खरेदी केलेल्या दस्तांची दप्तरी नोंद करून ताबा पावती देण्याच्या मोबादल्यात पाच हजाराची लाच मागणाऱ्या उपनिंबध सहकार अधिकारी व सहाय्यक सहकार अधिकारी याना लाचलुचपत विभागाने पाच हजाराच्या लाचेची पंचासमक्ष मागणी केल्याने त्यांना अटक केली.या कारवाईने खळबळ उडाली.

या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी सिंधी कॉलनी भागात खरेदी केलेल्या घराची दप्तरी नोंद करून पावती देण्याच्या मोबादल्यात उपनिंबध सहकारी संस्थेत काम करणारे सहकार अधिकारी विजय सुरेशचंद्र गोसावी,वय-५४ रा. आशा बाबा नगर आणि सहाय्यक सहकार अधिकारी चेतन सुधारक राणे ,वय-४८ रा. गणेश कॉलनी जळगाव यांनी ५ हजाराची पंचा समक्ष मागणी केल्याने लाचलुचपत विभागाने दोघांना ताब्यात घेतले असून गुन्हा नोंदविण्याचे पुढील काम सुरू आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजो बच्छाव, पो.नि. एन.एन.जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पोहेकॉ अशोक अहीरे, पोहेकॉ सुनिल पाटील, रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ. शैला धनगर, पोना सुनिल शिरसाठ, मनोज जोशी, पोना जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पोकॉ महेश सोमवंशी,पोकॉ ईश्वर धनगर पोकॉ नासिर देशमुख, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!