भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

कौतुकास्पद : आपत्ती व्यवस्थापनच्या विद्यार्थ्यांनी वाचवले रुग्णाचे प्राण

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। रक्तदान हेच जीवनदान असे म्हटले जाते. तुम्ही दान केलेले रक्त कोणाचा तरी जीव वाचवू शकते .असाच प्रत्येय जिल्हा सामान्य रुग्णालयात आला.बोदवड तालुक्यातील गरीब रुग्ण व जामनेर तालुक्यातील मालखेडा येथील महिला रुग्णाला रक्ताच्या अभावी उपचारास अडचण येत होती सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्या रुग्णाकडे उपचारासाठी देखील पैसे नव्हते.ना. गिरिषभाऊ महाजन जनसंपर्क कार्यालयातून माहिती मिळाल्याने याची तात्काळ दखल घेतली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेत असलेले मयुर आनंदा जंजाळ व गणेश येऊल या विद्यार्थ्यांनी रुग्णाला रक्तदान करून दिल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचले व उपचारासाठी देखील मदत केली, याची दखल घेत जिल्हाधिकारी अमनजी मित्तल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजयजी गायकवाड , जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे रावल सर यांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरविले व कौतुकाचे थाप दिली आहे. कोणत्याही अत्यावश्यक वेळी सेवेसाठी तत्परतेने सेवा देण्याचा मानस मयूर जंजाळ याने व्यक्त केला

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!