भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

राजकीय द्वेषापोटी दूध संघावर समिती गठीत : गिरीश महाजनांवर खडसेंचा आरोप

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। राजकीय द्वेषापोटीच जाळगाव जिल्हा दूध संघावर समिती गठीत केल्याचा आरोप करत , मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. तसेच राज्य सरकारच्या प्रशासकाची नेमणूकीच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली असल्याची माहिती आज माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी दिली.

जळगाव मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना खडसे म्हणाले की, राजकीय हेतूने आ.गिरीश महाजन, एन.जी.पाटील यांनी दिलेल्या अर्जावर मुख्यमंत्र्यानी समिती नेमली. मी आव्हान देतो, कुणीही यावे आणि दूध संघात पाहणी करावी. सरकारच्या तपासणीत आजवर कोणतेही गंभीर दोष आढळून आले नाही. केवळ राजकीय द्वेषापोटी हे केले जात आहे. संचालक मंडळ बरखास्त करायचे होते तर त्याची चौकशी होणे, त्यांच्यावर आरोप सिद्ध होणे आवश्यक होते,असेही खडसे म्हणाले. दूध संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या असून न्यायालयाने दि.३० सप्टेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती दिली आहे. त्यामुळे सहकाराच्या एका नियमानुसार निवडणूक होईपर्यंत संचालक मंडळ कार्यरत राहू शकते. याबाबत उच्च न्यायालयात दावा दाखल केला असून न्यायालयाने दावा स्वीकारलाही आहे. सोमवारी त्यावर कामकाज होणार असल्याची माहिती देखील खडसेंनी दिली आहे.

दूध संघ १९९५ मध्ये विक्रीस निघाला होता. अशा स्थितीत मी मंत्री असताना तो एननडीडीबीकडे सोपविला. पुढे लोकनियुक्त संचालक मंडळाची निवड करून त्यांनी दूध संघाची स्थिती सुधारली. आज दूध संघाचे भाग भांडवल १५ कोटींच्यावर गेले आहे. आज दररोज ४ लाख लीटर दूध रोज येते. एकूण २५ कोटी नफ्यापर्यंत दूध संघ पोहचणार आहे, असे खडसे म्हणाले.देशात या दुध संघाने आपला लौकिक वाढवला आहे. एन.जी.पाटील हे १९९९ मध्ये दुध संघात कार्यरत होते. विविध कारणांसाठी त्यांना बदतर्फे करण्यात आले. आजवर त्यांनी ५० तक्रारी केल्या आहेत.

बडतर्फ कर्मचाऱ्याच्या अर्जावर चौकशी नेमणे, हे अनाकलनीय आहे. दूध संघात एकही व्यक्तीची भरती झाली नाही तर भ्रष्टाचार होणार कसा? निवड झालेल्या उमेदवारांची यादी न्यायालयात गेली असून हा प्रश्न न्याय प्रविष्ठ आहे, असे खडसे यांनी स्पष्ट केलेय. दरम्यान, जोपर्यंत न्यायालयाचा निकाल लागत नाही तोवर मंत्रिमंडळ विस्तार होऊ नये असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. तसेच न्यायालयाचा निर्णय विरोधात गेला तर तर सरकार कोसळू शकते, असे खडसे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!