भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

षडयंत्र करून मला ‘ड्रग माफिया’ दाखवून तुरुंगात टाकण्याचा डाव होता : गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा।। राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना चंद्रशेखर बावनकुळे तसेच अनेक भाजप नेत्यांना षडयंत्र करून फसविण्याचा हा डाव होता. मला तर ‘ड्रग माफिया’ दाखवून थेट दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येत होता, असा खळबळजनक दावा माजी मंत्री व भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

माझ्या विरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा पुण्यापासून पाचशे किलोमीटरवर असलेल्या एका गावात दाखल करण्यात आला. त्यातही पोलिसांवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा कट रचला होता. आपल्या वाहनात ड्रग टाकायचा, ते पकडायचा आणि आपल्याला ड्रग माफिया म्हणून घोषित करून तुरूंगात टाकायचे, असे षडयंत्र आपल्याविरुद्ध करण्यात आले होते. त्याबाबत झालेल्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचा उलगडा झाला आहे. त्याचा तपास चौकशी आता ‘सीबीआय’कडे दिली आहे. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असेही भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

कोणीतरी तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात ही रेकॉर्डिंग सादर करून सर्व कट उघडकीस आणला. यात गिरीश महाजन यांना राजकीय जीवनातून संपवायचे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस संपतील आणि भाजप आपोआप संपेल, असा हा डाव होता. मात्र रेकॉर्डिंगमुळे सर्व षडयंत्र उघडकीस आले. या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने ते पोलिसांकडे दिले. परंतू आता आमचे सरकार आल्यामुळे आम्ही हे सर्व प्रकरण चौकशीसाठी ‘सीबीआय’कडे दिली आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी होईल, त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांचीही चौकशी होईल व त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा आशावाद देखील महाजन यांनी बोलून दाखवला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!