भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

वादग्रस्त वक्तव्य केलेल्या पो.नी. बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने बकालेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यानिमित्ताने बकाले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पोलिसांच्या अहवालात ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यापासून किरणकुमार बकालेंनी आपला मोबाईल दि.१५ सप्टेंबर पासून बंद करून ठेवलेला आहे. बकाले देखील सहाय्यक फौजदार महाजन यांच्याप्रमाणे मोबाईल गहाळ झाल्याचे खोटे सांगून पुरवा नष्ट करण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल होताच किरणकुमार बकाले हे आपली अटक टाळण्यासाठी भुमीगत झाले आहेत. आगदी त्यांचा मोबाईल देखील बंद करुन ठेवला आहे. एवढेच नव्हे तर निलंबन कालावधीत पोलीस उपधिक्षक गृह, नाशिक ग्रामीण यांच्याकडे हजर होत नियमीत हजेरी देण्याबाबत आदेश दिल्यानंतरही बकाले नमुद ठिकाणी हजर झालेले नाहीय,

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित करून नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला असून ते भूमिगत आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली होती. न्यायाधीश बी. एस. धिवरे यांच्या न्यायालयात दोन्ही बाजूने सुमारे तासभर युक्तिवाद सुरू राहिला. मात्र, त्यावर निकाल राखून ठेवण्यात आला होता. आज अखेर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळत असल्याचे सांगितले. दुसरीकडे बकाले यांना अटक करा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!