जळगाव जिल्ह्यात आज १२ कोरोना चे रुग्ण
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मधल्या काळात कोरोनाने विश्रांती घेतली होती परंतु गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने तोंड वर काढायला सुरुवात केली आहे.जळगाव जिल्ह्यात आज नव्याने १२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असून सध्या जिल्ह्यात ३६ कोरोना बाधित रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीपासून कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत असून गेल्या चोवीस तासात जळगाव जिल्ह्यात नव्याने १२ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत ही मोठी चिंतेची बाब आहे.यात जळगाव शहर ५, भुसावळ तालुका ६ आणि चोपडा तालुक्यातून १ असे एकुण १२ रूग्ण आढळून आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ५१ हजार ६१३ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ४८ हजार ९८५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३६ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी एका प्रसिध्दपत्रकान्वये जाहीर केले आहे.