भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावशैक्षणिक

दांडीबहाद्दर १२ शिक्षक व कामात कुचराई करणारे मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी निलंबित

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कामात कुचराई केल्या प्रकरणी गटशिक्षणाधिकारी तर शाळेला दांडी मारणार्‍या जिल्ह्यातील १२ शिक्षकांना निलंबीत केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असताना अनेक शिक्षक शाळेत उपस्थित राहत नाहीत. अश्या प्रकारच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून पथक पाठवून शाळांची तपासणी करण्यात आली यामध्ये काही शाळांमध्ये शिक्षकांनी विनापरवानगी शाळेला दांडी मारल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्याचे आदेश सायंकाळी पारीत करण्यात असून यात मोरझिरा (ता. मुक्ताईनगर) येथे ३ शिक्षक वाडे (ता. भडगाव) येथील मुलांची आणि मुलींच्या शाळेतील ५ शिक्षक गैरहजर होते. उत्राण (ता. एरंडोल) येथील शाळेत ४ गैरहजर शिक्षकांवरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करण्यात आले असून या सर्व १२ शिक्षकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी बुधवारी निलंबित केले.

तसेच मुक्ताईनगरचे गटशिक्षणाधिकारी विश्‍वनाथ धनके यांच्यावरही चुकीची माहिती देणे, कर्तव्यात कसूर करण्यासह अन्य आरोप असल्याने यांनाही निलंबित करण्याचे आदेश काढले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केलेल्या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाल्याने दांडी बहाद्दर शिक्षकांच्या मनात धडकी भरली  आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!