भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

टाकी साफ करताना तीन कामगाराचा गुदमरून मृत्यू

Monday To Monday NewsNetwork।

जळगाव (प्रतिनिधी)।जळगाव येथील सहकारी औद्योगीक वसाहती मधील कंपनीतील टाकी साफ करतांना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. यामुळे एमआयडीस परिसरात खळबळ उडाली .

या बाबत मिळालेली माहिती अशी की, सहकारी औद्योगीक वसाहतीतल्या समृध्दी केमिकल या कंपनीत हे तिन्ही कामगार कामाला होते. तीन दिवसांपासून कंपनी बंद होती. यामुळे येथील टाकीमध्ये गाळ साचला होता. हा गाळ साफ करण्याचे तिन्ही कामगारांना सांगण्यात आले होते. यात पहिल्यांदा दिलीप सोनार गळ काढताना गाळात अडकला. त्याला सोडविण्यासाठी हे दोन्ही जण गेले असता ते देखील यात अडकले. यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी तिघांना तपासून मृत घोषीत केले.

मिळालेल्या माहिती नुसार रवींद्र उर्फ गोटू झगडू कोळी (वय ३० चिंचोली या. यावल), दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि आणि मयूर विजय सोनार (वय ३०, रा. कांचननगर, जळगाव) ही यातील तिन्ही मृतांची नावे आहेत. समृध्दी केमिकल्स ही कंपनी ऑर्गेनिक खते आणि अन्य सामग्री बनविण्यासाठी प्रसिध्द आहे. कंपनी तीन दिवस बंद असल्याने यात साचलेले पाणी आणि अन्य सामग्रीमुळे टाकीत मोठ्या प्रमाणात गाळ निर्मित झाला असावा. याचीच सफाई करण्यासाठी हे तिन्ही कर्मचारी गेले असता त्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!