ठरलं ; जिल्हा दूध संघाच्या चेअरमन पदी “यांच्या” नावावर शिक्कामोर्तब
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यभर चर्चिल्या गेलेल्या जिल्हा दूध संघाच्या झालेल्या निवडणुकी नंतर चेअरमन निवडीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या संचालकांच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले, जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांची मोठी भूमिका आहे , या संदर्भात अधिकृत घोषणा आज रविवार दि,१८ रोजी होणार आहे.
बहुचर्चित जळगाव जिल्हा दूध निवडणूक झाल्यानंतर संघाची चेअरमनपदाची निवड १८ रोजी होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री नूतन संचालकांची बैठक झाली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह संचालक उपस्थित होते. रात्री ११ वाजेपर्यंत ही बैठक चालली. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत व शिक्कामोर्तब झाले.
मुक्ताईनगर मतदार संघातून मंदाकिनी खडसे यांना त्यांच्याच मतदार संघातून आव्हान देत विजय मिळविलेल्या मंगेश चव्हाण यांचीच चेअरमनपदी निवड होणार असे संकेत होते. त्यानुसार चव्हाण यांच्याच नावावर बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.