भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची फेसबुकवर बदनामी, गुन्हा दाखल

जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। ‘आम्ही वारकरी’ नावाच्या फेसबुक पेजवर भाजपनेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञान व्यक्ती विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपनेते राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मंगळवार, १८ रोजी संध्याकाळी सात वाजता देशमुख हे फेसबुक पेज पाहत असताना ‘आम्ही वारकरी’ नावाच्या पेजवर भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचे दिसून आले. देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ४९९ व ५०० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!