भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

चक्क अपर पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवून पैशांची मागणी

जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सायबर गुन्हेगारांनी आता पोलिसांनाही लक्ष करणे सुरू केले आहे. त्यात चक्क जळगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून आले आहे. चंद्रकांत गवळी यांचे बनावट फेसबुक अकाउंट बनवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत चंद्रकांत गवळी यांच्या नावाने पैशांची मागणी करीत असल्याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयातील रायटर अजय शांताराम पाटील ,वय ३६, रा. नवीन पोलीस कॉलनी . यांनी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे सायबर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल केला आहे. २८ मार्चपासून आजपावेतो कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चंद्रकांत गवळी यांचे फेसबुकवर बनावट खाते उघडून लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत आहे. तसेच त्याद्वारे पैशांची मागणी करीत आहे.

त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यातर्फे सायबर पोलीस स्टेशनला ७ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर करीत आहेत. दरम्यान नागरिकांनी माझ्या फेसबुक व इतर सोशल मीडिया अकाउंटची खात्री केल्याशिवाय प्रतिसाद देऊ नका. सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!