जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या लांबपल्ल्यांच्या बसेस रद्द
जळगाव,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। सध्या गणेशोत्सवासाठी मुंबईतील कोकणात घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची सोय व्हावी यासाठी जिल्ह्यातून मुंबई येथे १५० बस पाठविण्यात आल्या आहेत.
जळगाव जिल्ह्यातून मुंबई,नाशिक,पुणे , सोलापूर , औरंगाबाद, अकोला, नागपूर अशा लांब पल्ल्यांच्या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत . त्यामुळे अशा ठिकाणी जाणार्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. जळगाव एसटी विभागाचे दिवसाला १५ लाखांचे उत्पन्न बुडेल. प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागणार आहे.